गेले काही दिवस चंद्र मिथुनेत होता आणि आता तो कर्केत आहे. शुक्र सध्या मिथुनेत आहे. शुक्राच्या वरती (पूर्वेला) पुनर्वसुचे दोन ठळक तारे आणि डावीकडे (दक्षिणेला) आर्द्रेतला ठळक प्रश्वा तारा स्पष्ट दिसतो. (आर्द्रा नक्षत्रात दोन तारे आहेत, त्यातील एक ठळक आहे आणि दुसरा अगदी मंद आहे. ठळक ताऱ्याला प्रश्वा वा इंग्रजीत प्रॉसिऑन असे नाव आहे.) रोहिणी वृषभ राशीमधला तारा आहे. सध्या वृषभ रास दिवेलागणीच्या वेळी क्षितिजापासून साधारण ३० अंशावर असते. तिथे उलट्या इंग्रजी वी "V" आकाराचे तारे दिसतील, त्यातील टोकाचा आणि तेजस्वी तारा म्हणजे रोहिणी. ते "वी" आकाराचे तारे म्हणजे वृषभाचे तोंड. उगवतीला हे उलटे तर मावळतीला सुलट दिसते.