गोखले साहेब,

आपले म्हणणे आम्हाला पटले नाही. ह्याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या वाक्यांचा उल्लेख तुमच्या पत्रात केला आहेत, ती सर्व शीर्षके आहेत. त्यांचा मूळ हेतू वाचकाचे लक्ष वेधून घेणे हा आहे आणि इतर भाषिक प्रसिद्ध वाक्य वा शब्द वापरून बातमीदाराने तो साध्य केला आहे असे वाटते. परंतु प्रत्यक्ष बातमीमध्ये जर हिंदी अथवा इंग्रजी शब्द असतील तर मात्र आपला आक्षेप योग्य असेल, असे वाटते.