याचा पूर्वी विचार केला नाही आयझॅक असिमॉवच्या नियमाप्रमाणे यंत्रे माणसांना इजा पोहचवू नये अशापद्धतीने बनवली होती. माणसांवर कुरघोडी करण्यासाठी नाही, परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व टिकवणे जरुरीचे आहे.

गोष्टीतून असे वाटते की मिनी आणि विद्या मोहनवर सुधीरप्रमाणे आणि विश्वास स्मितावर प्रेम करू लागेल/ लागले. मानव यंत्रांचे यांत्रिक अस्तित्व नाकारून त्यांच्याकडून मानवी भावनांची अपेक्षा करू लागेल आणि त्यामुळे समाजात इंबॅलन्स निर्माण होईल हे लक्षात आल्याने शुक्राचार्यांना आपले प्रयोग फोल ठरल्याची उपरती झाली आणि त्यांनी आपल्या यांत्रवांना परत बोलावले. (फारतर) ग्राहकांकडून घेतलेले पैसे त्यांनी त्यांच्या खात्यात पुन्हा जमा केले.

(म्हणजे गोष्टीत सगळेच चांगले. गोष्टीचा शेवट असिमॉवच्या नियमांवर आधारित असेल असे वाटले. गोष्ट वाचून स्टेपफोर्ड वाईफ या सिनेमाची आठवण झाली.)