माझे वाचन (बालपणापासून) प्रामुख्याने वर्तमान पत्रामुळेच योग्य झाले आहे हे नमूद करावयास मला अजिबात संकोच वाटत नाही..

सर्वसाक्षी व को अहम यांच्यांशी सहमत.

ही परिस्थिती माय मराठीच्या लेकरांनीच (होय लेकरांनीच) स्वतःहून आणली आहे.

मातृभाषेतून संवाद करणे जर लाजिरवाणे/हिणकस वाटत असेल तर आपण मराठीला "मातृभाषा " कसे काय म्हणू शकतो..

ऊठ सुठ परप्रांतीयांना नावे ठेवण्यापेक्षा आपणच जास्तीत जास्त / आग्रहपूर्वक मराठीचा वापर करावा...

मी आजतागायत एकही अ-मराठी शुभेच्छा संदेशाचा वापर केला नाही व त्यामुळे मला कोणतीही अडचण आली नाही..