आपण मराठीतून बोललो तर आपले वर्तुळ, महत्त्व व वाटचाल मर्यादित राहील; आपल्याला बाह्य जगात किंमत मिळणार नाही, आपण मागास भासू या भयगंडाने तसेच आपण उच्चभ्रू समाजाचे प्रतिनिधित्व करायचे तर मराठी बोलणे परवडणार नाही या समजाने पछाडलेले अनेक मराठी लोक आवर्जून हिंदी वा इंग्रजीने बरबटलेले मराठी बोलतात.
पूर्णपणे सहमत!
वर्तमानपत्राचे मूल्य किती हा प्रश्न निरर्थक आहे. त्याला एक चेहरा आहे, ओळख आहे, एक प्रतिष्ठा आहे ती वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन असल्यामुळे आहे
मला वाटते, श्री. मनोजय इथे वर्तमानपत्राच्या धंद्याच्या गणिताविषयी बोलत होते. पण असे करतांना त्यांना व्यवसायाची सामाजिक बांधिलकी असते, (cororate social responsibility) ह्याचा विसर पडलेला दिसतो.