आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. हे चित्र प्रतिमाग्राही तिपाईवर सज्ज करून 'रात्र' चित्रण्सुविधा वापरून काढले आहे. डिजिटल कॅमेरा ऑलिंपस सी ७७० यु झेड वरून ३८० मिमि (एक भिंगिय परीवर्तक {एस एल आर}कॅमेऱ्याच्या परिमाणात ) भिंग वापरून स्वयंचलीत कळनियंत्रणाद्वारे टीपले आहे. जेव्हा अंधारातील वा कमी प्रकाशातील चित्र घ्यायचे असते वा दूरचित्रण भिंग (टेलीफोटो लेन्स) वापरायचे असेल तेव्हा तिपाई व स्वयंचलीत कळनियंत्रण वापरणे उत्तम; त्यामुळे सूक्ष्म थरथर वा धक्का यामुळे प्रतिमा धूसर होण्याचा वा पसरण्याचा धोका टळतो.

धन्यवाद