घाणरडे व अशुद्धलेखनाने बुजबुजलेले मराठी फक्त महाराष्ट्र टाइम्समध्येच असते.  प्रदीप यांना अभिप्रेत असलेले मुंबईचे दुसरे वर्तमानपत्र इतके वाईट नसते. सामना-नवाकाळ तर आपल्या शुद्ध सडेतोड अग्रलेखांकरिता गाजतात. खाडिलकरांना अग्रलेखकांचा बादशहा म्हणतात.  मराठीखेरीज अनेक हिंदी-गुजराथी वर्तमानपत्रे मला वाचायला मिळतात. मध्यप्रदेशातील अतिशय कमी जाहिराती असलेल्या भास्कर आणि जागरण यांचा दर्जा पाहिला तर मराठी वर्तमानपत्रे किती मागासलेली आहेत हे लक्षात येते. त्यांच्यातील वार्ताहरांना आणि लेखक-संपादकांना  तरुणवर्गाला आकर्षित करण्यासाठी मटासारखे धेड‌इंग्रजी लिखाण छापावे लागत नाही. महाराष्ट्र टाइम्सला आपली घसरण अशीच चालू ठेवायची असेल तर त्यांनी पेपरचे नाव बदलून हिंग्रजी टाइम्स ठेवावे. नाहीतरी अर्धे नाव मुळातच इंग्रजी आहे!!