आपल्या विश्वासारखीच अनेक विश्वे या अंतराळात आहेत आणि त्या विश्वातही आपल्यासारखीच माणसेही म्हणजे चक्क तू ,मी .विद्या अशी आहेत फक्त त्यांचे संदर्भ वेगळे आहेत आणि प्रगतीचे वेग वेगवेगळे आहेत,अशाच एका आपल्याहून प्रगत विश्वातील काही जण आपल्या विश्वात कसल्याशा धक्क्याने फेकले गेले. कदाचित त्यांच्या विश्वातही मयासुर यांत्रव केंद्राची त्याने जाहिरात केली असेल ,त्यामुळे ती आपल्या विश्वात वावरत असल्यासारखीच येथे वावरली त्यानी आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असे यांत्रव बनवले

कल्पना लक्षात आली परंतु तिचा उलगडा फारच त्रोटक वाटला. एका काळातून दुसऱ्या काळात प्रवास करणे आणि इतिहासातील काही गोष्टींचे किंवा भविष्यातील काही गोष्टींचे आणि तत्कालिन व्यक्तींच्या जीवनाचे साक्षिदार होणे किंवा स्वतःच स्वतःचे बालपण/ वृद्धत्व त्रयस्थपणे पाहणे ही कल्पना नवीन नाही परंतु त्या साक्षिदारांना आपण वेगळ्या जगात वावरतो आहोत याचा उलगडा लागलीच होतो. डॉ. शुक्राचार्यांना जाहिरात प्रदर्शित करून यांत्रव विकेपर्यंत आणि त्या यांत्रवांनी इतके दिवस काम करेपर्यंत या गोष्टीचा पत्ता लागलाच नसेल असे मानणे म्हणजे त्यांच्या अतिप्रगत मेंदूवर अन्याय वाटला.

कल्पना चांगली असली तरी ती वेगळ्या रितीने अधिक खोलात जाऊन फुलवायला हवी होती असे वाटते.