आमच्या सोसायटीत एका रहिवाशाला वास्तुशास्त्रातल्या लोकांनी सांगितले की तुमचा घरात येणारा दरवाजा योग्य ठिकाणी नाही म्हणून तुमच्या घरी सुख शांती नांदत नाही.तो दरवाजा दुसरीकडे करावा म्हणजे डाव्या बाजूला. अर्थात हा दरवाजा डाव्या बाजूला केला तर तो समोरच्या घराच्या दरवाजाच्या अगदी समोरच येईल.अस झालं तर दोन्ही जणांनी आपले दरवाजे उघडले तर एक इंच एवढीच जागा उरते बाकी सगळं विचार करण्याच्या पलीकडे.
आता बघू काय होईल ते समोरच्या घरात राहणाऱ्यांचा आणि सोसायटीतल्या रहिवाशांचा विरोध आहे. तो दरवाजा तिथे करण्यासाठी आणि स्वतःच्याच घराचा कायापालट करण्यासाठी किती वर्ष जातील मग त्यांच्या घरी सुख शांती लाभेल तोपर्यंत होणाऱ्या मनस्तापासाठी वास्तुशास्त्र वाल्यांना धन्यवाद.
पूर्ण सोसायटीत राहणाऱ्या लोकांनच्या घरी हि कशी सुख शांती लाभेल हे हि कळवा. गरज लागली तर बिल्डिंग पाडून डाव्या उजव्या बाजूला करू.कारण सुख शांती तर हवीच.