.. तरीही एका दिवसात कटिंग चहाच्या चिकित्सेपेक्षा जास्त चिकीत्सा झालीच.

1) वर्तमानपत्राचे मूल्य किती हा प्रश्न निरर्थक (गौण) आहे. त्याला एक चेहरा आहे, ओळख आहे, एक प्रतिष्ठा आहे ती वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन असल्यामुळे आहे. म्हणूनच वर्तमानपत्रे, नाट्य-चित्र-मालिका कलावंत यांनी आपल्या भाषेचे भान व मान राखले पाहिजेत
अगदी बरोबर,पण हे आज सन 2007 साठी नाही, गोखले म्हणतात त्या 1985 पूर्वीच्या काळासाठी ते बरोबर आहे. आज हे जे काय तथाकथित समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन आहे ना, ते पंधरा- वीस मिनीटांपेक्षा जास्त हाती धरले जात नाही, असे शास्त्रशुद्ध पाहण्यांचे निष्कर्ष आहेत. मग जर साधकालाच फारशी गरज नाही, तर साधनाला तरी त्याची पर्वा का वाटावी.

2) मनोजय इथे वर्तमानपत्राच्या धंद्याच्या गणिताविषयी बोलत होते. पण असे करतांना त्यांना व्यवसायाची सामाजिक बांधिलकी असते, (corporate social responsibility) ह्याचा विसर पडलेला दिसतो.

corporate social responsibilityमध्ये जुन्या वळणाच्याच (शुद्ध) भाषेचा अभिमान आणि राखणावळ कुठे, कशी येते बुवा? जगभरातल्या सीएसआर पद्धतींविषयी वाचतोय,  पण मला तरी आजवर कुठे आढळली नाही. कुणाला आढळल्यास या चर्चेत लिंकीत करून उपकृत करावे ही विनंती.

3) भेसळीला समृद्धीचे नाव दिलेले काही रुचले नाही. समृद्धीची आणि भेसळीची त्यांच्या मते परिभाषातरी काय असावी?

अहो, भेसळ म्हणजेच समृद्धी. तिच्याशिवाय मजबूती, टिकाऊपण, समृद्धी, आकर्षकता येतच नाही. शुद्ध कधीच वाढत, तरारत नसते. ते एकटेच कमजोर पडत जाते आणि निष्प्रभावी होते, नष्ट होते.

4) एखाद्या संकल्पनेसाठी जर मूळ भाषेत शब्दच अस्तित्वात नसेल, ... तर परकिय भाषेतून शब्द घेण्यास हरकत नसावी. आपण दाखवलेले अनेक फारसी शब्द मराठीत असे आलेले आहेत, तसेच मला वाटते, तेलुगूतूनही आपल्या भाषेत बरेच शब्द आलेले आहेत, व त्यांचा आपण सहज स्वीकार केलेला आहे. ह्याचप्रमाणे इंग्रजीतूनही आपण कैक शब्द घेतलेले आहेत व ...

आपण घेणारे कोण हो?  या भाषा बोलणारे येतात. 'बाप' बनून राहतात, आणि झक्कत आपल्याला त्यांचे शक्य तेवढे अनुकरण करावे लागते,  भाषेचेही अनुकरण करावे लागते. ही वस्तुस्थिती आहे.


3) तडका हा शब्द प्रयोग पदार्थ सूचीमध्ये वाचताना खटकत नाही कारण दाल-तडका हा काही मराठी पदार्थ नाही.

दाल तडका म्हणजे मराठीत फोडणीचे वरण. (कृती वेगळी असेल, पण दोन शेजारच्या घरांतही वरणाची कृती सारखी नसते) ते आपण हॉटेलात तडका घेत चालवून घेतो. आणि जर अमराठी वरणाला तडका चालणारच असेल तर वरच्या शिर्षकातही तो कॅरेबियन करीला दिलेला होता, भरल्या वांग्याच्या भाजीला नव्हे. तेव्हा चालवून घ्या.