1) स्तुती कुणाला प्यारी नसते? धन्यवाद.

2) मॅक क्लीलंड मी वाचला नाही म्हणून विचारतो, माफ करा. त्याने एका चौथ्या व्यक्तिविषयी काहीच सांगितले नाही का? ही व्यक्ति जत्रेची ठिकाणे माहिती करून घेते, तिथे मोक्याच्या जागा शोधते. तिथे कड्या अडकवण्याचा सुपीक खेळ उभारते. सर्व प्रकारचे लोक त्यात गुंततात आणि दर फेकीमागे त्याची प्राप्ति वाढवून देतात. या व्यक्तीविषयी मॅक क्लीलंड काही म्हणतो का याची मला उत्सुकता आहे.

3) हे असं उघड्यावर मार्गदर्शन, दिशा वैगरे दाखवण्याचा उद्योग म्हणजे निव्वळ डोंबाऱयाचा खेळ की हो होईल ज्यांना खरीच दिशा पहायचीय, ते येतील व्यक्तिगत निरोपात. हां चर्चेच्या प्रस्तावावर विचार करता येईल. (हुंजाऊद्या मनोरंजनाचा आणखी एक राऊंड)

4) आपल्या प्रयत्नांचे चुकीचे वर्गीकरण होण्याचा धोका आहे, असं म्हणता? हुं... पण, कोण काय वर्गीकरण वैगरे करतो त्याची चिंता आपणकशाला वहायची ? करणारे करतील वर्ग आणि खेळत बसतील एकट्याने बुद्धीबळ. खेळू द्यात. एंजॉय.