आम्हाला काय आवडत ? युवा वर्ग लक्षात घेऊन हे जर असे वर्तमान पत्र  काढणार असतील तर आम्हाला उत्तम मराठी देणार आणि शिकवणार अजून एक माध्यम हवं. यात एकतर मनोगत सारख्या माध्यमाची जास्त जाहिरात झाली पाहिजे किंवा या वर्तमान पत्रांना असलेला दुसरा पर्याय निवडला पाहिजे.

आमच्या घरी नवं शक्ती आणि म.टा. येतो. माझी एवढी तरी तयारी आहे की ज्या वर्तमान पत्रात उत्तम मराठी वापरलं जात तो घ्यायचा. जोपर्यंत म.टा.  विकला जाईल तोपर्यंत ह्यांना हाच गैरसमज राहिलं की आमचा पेपर मराठीची मोडतोड करून जास्त विकला जातो.

स्वतःला नंबर १ म्हणवून घेणाऱ्या या वर्तमान पत्रात एक हि भाषा धड वापरली नाही. यावर दुसरा पर्याय सांगा. कोणी वर लिहिलं आहे म.टा. ला पत्र लिहा आम्ही तुमचा पेपर बंद करत आहोत म.टा. ला दणका देणं आवश्यक आहे नाहीतर हळूहळू सर्व वर्तमानपत्र अशीच होतील. पेपर बंद करणं जमणार नसेल तर म.टा. च्या स्पर्धकांचे हि तेवढेच पेपर विकले गेले पाहिजे. पर्याय निवडा .