मराठी जनाना मराठी टिकावी असे वाटते काय? व्यवहारात तसे दिसत नाही. दोन मराठी माणसे आपआपसात बोलत असली तरी हिंदी/इंग्रजीत बोलणे पसंत करतात. मऱाठी माध्यमाच्या शाळेत मुलाना न शिकवता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात. मराठीची टिंगल केली तर निमुटपणे ऐकुन घेतात. हे लिहताना मी इंग्रजी प्रमाणे टंकलेखन करतो. याचा अर्थ थोडक्यात मला वाटते की माझे पोट भरण्याकरता मराठी निरुपयोगी आहे. मी माझ्या संस्कृतीला अजिबात महत्त्व देत नाही.
केरळ राज्य महराष्ट्राच्या एक चतुर्थांश सुद्धा नाही. तरीपण दोन मल्याळी भेटले तर मल्याळीमध्येच बोलतात. त्यानाही पोटापाण्याची चिंता आहे. त्या करता ते इंग्रजी शिकतात, आपल्या पेक्षा त्यांचे इंग्रजी उत्तम असते. याला कारण त्याना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान आहे. तीच तऱ्हा बंगाल, पंजाब, गुजराथ, कर्नाटक, आंध्र, तमीळनाडु, असम या राज्यात दिसते.
संस्कृती टिकवायची असेल तर मराठी टिकणे आवश्यक आहे. नसेल तर इंग्रजी/हिंदी आत्मसात करा.