लेख आवडला. लेखाचे वाचन आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचे वाचन यांच्या दरम्यान मुंबई-चेन्नै आणि पुन्हा चेन्नै-मुंबई असा हवाई प्रवास घडला. परतल्यानंतर प्रतिक्रिया लिहू असा विचार केला होता पण आल्यावर पाहिले तर प्रतिक्रियांची लांबी ('कोसला' आणि 'कोसलावरून' ची आठवण झाली) खूपच वाढली होती. प्रतिक्रियेला त्यामुळे आणखी उशीर झाला.

'तबकड्या' शी ध्वन्यात्मक साधर्म्य असणारा 'छबकड्या' शब्दही आवडला. लेखाच्या शीर्षकापासूनच खुमासदार शैलीत हवाई सुंदरी-विमान प्रवास यावर लेख असणार हे स्पष्ट झाले. हसतमुख, कार्यतत्पर हवाई सुंदरींचे कौतुक हा लेखाचा गाभा असल्याने मला तरी यात काही आक्षेपार्ह वाटले नाही.

लेखाच्या शैलीवरून/काही प्रतिसादांवरून काहींना स्त्रीमुक्ती-पुरुषमुक्ती अशा मुक्त समाजाला पाचारण करावे वाटले, हे पाहून मात्र प्रश्न पडला की आपण मनोगतावर वावरणारे सारेच अशा कोणत्या बंधनांमध्ये अडकलो आहोत की अशी हाक द्यायची गरज पडावी? नितांत वैयक्तिकतेचे तर हे बंधन नाही ना?

एका परिचित मराठी हवाई सुंदरीला मनोगतावरच्या या लेखाचा संदर्भ दिला आणि लेख वाचायला सांगितला. लेखाचं शीर्षक ऐकून तीही खूश झाली....बघू. थोडी वाट पाहू. आपली मराठी छबकडी मनोगताची सदस्य होऊन आपली काय प्रतिक्रिया देतेय. आणि हो, विमान प्रवासात यावेळी हसतमुख छबकडेच होते..  कार्यतत्पर.. स्मितसखे!