4) एखाद्या संकल्पनेसाठी जर मूळ भाषेत शब्दच अस्तित्वात नसेल, ... तर परकिय भाषेतून शब्द घेण्यास हरकत नसावी. आपण दाखवलेले अनेक फारसी शब्द मराठीत असे आलेले आहेत, तसेच मला वाटते, तेलुगूतूनही आपल्या भाषेत बरेच शब्द आलेले आहेत, व त्यांचा आपण सहज स्वीकार केलेला आहे. ह्याचप्रमाणे इंग्रजीतूनही आपण कैक शब्द घेतलेले आहेत व ...
आपण घेणारे कोण हो? या भाषा बोलणारे येतात. 'बाप' बनून राहतात, आणि झक्कत आपल्याला त्यांचे शक्य तेवढे अनुकरण करावे लागते, भाषेचेही अनुकरण करावे लागते. ही वस्तुस्थिती आहे.
...... भाषा ही नेहमी जेत्यांची -नेत्यांची, नवकोट नारायणांची, खऱ्या अर्थाने समर्थ- सार्वभौम व्यक्तिंचीच वापरली जाते, वाढते, टिकते.
हे असे सगळे एव्हढे सरळ आहे? मायमराठीपासूनच सुरुवात करुया. मुंबईच्या विकासापासून, म्हणजे २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून. मुंबईत गुजराती व पारसी लोक संख्येने व अर्थशक्तिने बहुसंख्य होते. किंबहूना मुंबईच्या विकासात ह्या दोन्ही समाजघटकांचा महत्त्वाचा हिस्सा आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. असे असूनही मराठीने गुजराती भाषेतून काही उचलले आहे, असे दिसत नाही.
इंग्रज १५० वर्षे भारताचे जेते म्हणून वावरले. तरीही फाळणीपूर्व भारताच्या अनेक भाषांवर इंग्रजीचा विशेष परिणाम झालेला दिसत नाही, जेव्हढा तो मराठीवर झालेला आहे-- बंगाली व सर्व दाक्षिणात्य भाषांची उदाहरणे तर मी अगोदर दिलेली आहेतच, पण दोन पाकिस्तानी पंजाबी एकमेकात बोलत असतांना दहा मिनिटे जरी आपण समोर राहिलात, तर आपल्याला फारच थोडे इंग्रजी शब्द ऐकू येतील.
बहासा इंडोनेशियावर डच भाषेचा, तसेच विएतनामी भाषेवर फ़्रेंच भाषेचा प्रदीर्घ परिणाम झालेले दिसत नाहीत.
सर्व प्रकारच्या चिनी भाषा परकिय आक्रमकांच्या (जेते, व नवकोट नारायणही) प्रभावापासून खूप दूर राहिल्या आहेत. ह्याची अनेक उदारहणे देता येतील--- हाँगकॉ̱गची कँटोनीज अथवा सिंगापूरची हक्का ह्यांच्यावर इंग्रजीचा अजिबात परिणाम नाही. तसेच मुख्य चीनमधली शांघाय वगैरे भागातली भाषा जपानी आक्रमकांनी जपानळेली नाही.
म्हणजे भाषा जेत्यांच्या अथवा बाहेरून आलेल्या नवकोट नारायणांच्या भाषेमुळे किती बदलू शकते, हे त्या त्या भाषेवर, किंबहूना त्या प्रांतातील लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.