मऱाठी माध्यमाच्या शाळेत मुलाना न शिकवता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात.
ठीक. बाकीचे आपल्या मुलांना स्थानिक भाषांतून शिकवतात असे आहे का? मला तरी माझ्या ओळखीच्या सुमारे २५ कुटुंबांपैकी (जे चेनै किंवा बंगलोरमधून आहेत, मुंबईमधील लोकांची गणती नाही.) सर्व आपल्या मातृभाषेतून न शिकता इंग्रजी माध्यमातूनच शिकलेले आहेत.
मराठीची टिंगल केली तर निमुटपणे ऐकुन घेतात. हे लिहताना मी इंग्रजी प्रमाणे टंकलेखन करतो. याचा अर्थ थोडक्यात मला वाटते की माझे पोट भरण्याकरता मराठी निरुपयोगी आहे. मी माझ्या संस्कृतीला अजिबात महत्त्व देत नाही.
यात मात्र त्यांची अस्मिता आपल्याहून अधिक जागृत असावी असे वाटते परंतु पोट भरण्यासाठी त्यांनाही आपल्या भाषा उपयुक्त आहेत असे वाटत नसावे. विशेषतः गल्फमध्ये राहून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या केरळींची मुले इंग्रजी माध्यमातच नाहीत तर महागड्या कॉन्व्हेंट्समध्ये शिक्षण घेतात, बोलताना मल्याळी जितकी सर्रास वापरतात तितकी लिहिताना वापरत नाहीत असे मला जाणवले आहे.
दोन तमिळांना बोलताना काळजीपूर्वक पाहा. ते ६०% इंग्रजी आणि ४०% तमिळ शब्द वापरताना दिसतील. एखादा शहरी परंतु चांगला १०-१२ वर्षांपूर्वीचा तमिळ चित्रपट पाहा. त्यातही ६०-४० चे गणित दिसेल. याकाळात हिंदी चित्रपटही इतके इंग्रजी शब्द वापरत नव्हते. सन टिव्हीची तिच गत.
मला वाटते, आपण मराठी उगीच उठसूठ दाक्षिणात्यांचे उदाहरण देऊन ते पाहा कसे बोलतात सांगत असतो. येथे संबंध संस्कृतीचा नसून अस्मितेचा असावा.