अजून गाती तुझीच गाणी दग्ध परांचे पक्षी
अजून उठते स्मृतिपटलावर तुझीच सुंदर नक्षी

अजून आतिल पार्‍यावरती तुझ्याच प्रतिमालाटा
अजून डोळे शोधत बसती तुझ्याच पाउलवाटा

अजून वेड्या वार्‍यावरती तुझाच दरवळ येतो
जुन मनाच्या दारावरती तुझाच पदरव होतो

अजुन लावतो पुन्हा उगाचच अर्थ तुझ्या शब्दांचा
अजून घेतो कधी कधी मी शोध तुझ्या गावाचा

वावाव्वा! विसुनाना अख्खी कविता फारच आवडली. सुंदर! हेमंत राजाराम ह्यांच्या कवितेनंतर  तुमची कविता वाव्वा.
मनोगताचा कविता विभागही पूर्वपदावर येतो आहे, असे दिसते.