-मला वाटतं , या विषयांची गल्लत होते आहे.
प्रत्येक माणसाची एक नैसर्गिक सुप्त इच्छा असते कि आपल्याला अनेक लोकांनी सुंदर म्हणावे आणि आपल्यापेक्षा कुणीही सुंदर असू नये. त्यासाठी चढाओढ ही आलीच. परंपरागत यात मुलींमधेच स्पर्धा जास्त होती. सर्वात सुंदर तरूणी मग एक सौंदर्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्धीच्या वलयात असायची आणि तिचे लवकरच एका सौंदर्याच्या प्रतिकात रूपांतर व्हायचे ! प्रत्येक पिढीमधे ही स्पर्धा होतीच. प्रमाण कमी जास्त हे पुढच्या पिढीने ठरवायचे. त्यामुळे प्रत्येक पिढीला नवीन प्रतीक असायचेच !! - हे हॉट होणे याचे लक्षण आहे.
मुलांमधे मात्र ही स्पर्धा कर्तृत्वामुळे प्रसिद्धी आणि त्यातून सर्वश्रेष्ठ , सर्वगुणसंपन्न पुरूष म्हणून देखणेपणा, पुरूषीसौंदर्याचे प्रतिक म्हणून परत मोठी प्रसिद्धी यामार्गाने ही वाटचाल होती. यामधेही स्पर्धा होतीच आणि ती ही भरपूर !!! - हेही हॉट होणे याचे लक्षण आहे.
आणि मग अश्या या स्पर्धांना जर प्रसाधन बनवणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक, आर्थिक प्रोत्साहन दिले असेल तर आपला आर्थिक फायदा करून घेण्यासाठी त्या पुढाकार घेऊन पुर्वीच्या यशस्वी आदर्शांना/ प्रतिकांना पुढे करून त्याचे भांडवल करून घेणारच. त्यातून आताचा जमाना वेगाचा ... त्यामुळे कष्ट घेऊन सुंदर बनायचे म्हणजे वेळ लागणारच, त्याऐवजी जर प्रसाधने वापरली तर मामला झटपट .. आणि सोपा होतो. काही काळापुरते का होईना आपण त्या प्रतिकांच्या जवळ गेल्याचा भास (स्वत:ला आणि लोकांना पण) होतो. - हे हॉट दिसणे याचे लक्षण आहे.
काळाचा महिमा हा असा आहे.
प्रसाद