लोकसंख्येच्या प्रमाणात पुस्तकांचा खप वाढलेला आहे काय ? मला तरी नाही वाटत. ज्यांना खरोखर वाचायची आवड आहे त्यांना किमती परवडत नाहीत आणि ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे त्यांना वाचायला वेळ नाही किंवा आवड नाही. तरी सुद्धा पुस्तकांचा खप वाढला म्हणून पाठ थोपटायची हौस ज्यांना आहे त्यांनी जरूर तसे करावे. नागपूरला संपन्न झालेल्या अ.भा. साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनातील पुस्तक विक्रेत्यांना त्यांचा अनुभव विचारावा. पुस्तके त्यावरील छापील किंमतीशिवाय विकत मिळणार नाहीत तेव्हा पुस्तकांचा खप वाढला असे समजावे.