फाईलकरिता नस्ती अथवा धारिका हा शब्द मराठीमध्ये रूढ आहे. अन्य शब्दांचे पर्यायांबाबत आलेले प्रतिसाद ठीक वाटतात. शेवटी सहज-सोपी, सहज रुळणारी भाषा वापरणे महत्त्वाचे. त्याचबरोबर एक गोष्टही तितकीच खरी आहे की केवळ शब्द कठीण म्हणून न वापरणेही योग्य नाही. अधिकाधिक सोपा पर्याय शोधत रहावे. परंतु तोपर्यंत शक्यतोवर मराठी शब्दांचाच (कठीण का असेनात) वापर करण्याचा प्रयत्न करावा. कारण कोणताही नवीन विषय शिकताना जशी त्या विषयाची परिभाषा आपणास शिकावी लागते (ती ही त्यावेळी कठीण/दुर्बोधच वाटते) तद्वत हा प्रयत्न असावा असे वाटते.