असे असूनही मराठीने गुजराती भाषेतून काही उचलले आहे, असे दिसत नाही.

उलट असे म्हणावेसे वाटते की; गुजराती भाषेने सर्वसंपन्न असलेल्या मराठी भाषेपासून बरेच काही घेतले / उचलले आहे-
जी भाषा लवचिकता दाखवेल तीच हुकूमत गाजवेल असे तर नाही ?

बहासा इंडोनेशियावर डच भाषेचा, तसेच विएतनामी भाषेवर फ़्रेंच भा‌षेचा प्रदीर्घ परिणाम झालेले दिसत नाहीत.

इतर देशांत काय चालले आहे व तेथल्या पारंपारीक बोलींवर इंग्लिशचा प्रभाव कितपत पडला आहे हे जर भारताबाहेरील मनोगतींनी सविस्तर लिहील्यास हा प्रादुर्भाव फक्त मराठीला झाला की इतर आंतरराष्ट्रीय भाषांनाही झाला हे कळेल !

सर्व प्रकारच्या चिनी भाषा परकिय आक्रमकांच्या (जेते, व नवकोट नारायणही) प्रभावापासून खूप दूर राहिल्या आहेत. ह्याची अनेक उदारहणे देता येतील--- हाँगकॉ̱गची कँटोनीज अथवा सिंगापूरची हक्का ह्यांच्यावर इंग्रजीचा अजिबात परिणाम नाही. तसेच मुख्य चीनमधली शांघाय वगैरे भागातली भाषा जपानी आक्रमकांनी जपानळेली नाही.

सहमत......!
काश्मीरी माय लेकी माझ्या बरोबर गेल्या महिन्यांत राजधानी एक्सप्रेसने मुंबई-दिल्ली प्रवास करीत होत्या. अठरा / वीस तासांच्या प्रवासात त्यांच्या संभाषणातले एक अवाक्षर मला कळले नाही !!!

म्हणजे भाषा जेत्यांच्या अथवा बाहेरून आलेल्या नवकोट नारायणांच्या भाषेमुळे किती बदलू शकते, हे त्या त्या भाषेवर, किंबहूना त्या प्रांतातील लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

१०१ % सहमत.......!