नाक्यावर अडीच-तीन रुपयांचा कटिंग चहा पिताना त्याची एवढी चिकित्सा आपण करतो का? मग जवळपास तेवढ्याच पैशांत मिळणाऱ्या सर्वच वर्तमानपत्रांबद्दल ही चर्चा नेहमी का होते? इतक्या कमी पैशात मिळणाऱ्या उत्पादनावर मराठीच्या रक्षण- संवर्धनाची जबाबदारी आपण का टाकतो? त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात ती पेलवेल का, याचा साधा विचार तरी कुणी केलाय का ? कोणत्या वर्तमानपत्राने ही जबाबदारी जाहीररीत्या उचलली आहे का?
मनोगतावर आपण फुकटात प्रतिसाद व मते टाकतो ना ?
कुठल्याही वृत्तपत्रात/दैनिकात/मासिकात आपले प्रतिसाद लगेच च्या लगेच प्रसिद्धीस येतात का ?
म्हणून मनोगताची तुलना अडीच-तीन रुपड्यांत मिळणाऱ्या कटिंगशी कराल का ?
कुठल्याच उत्पन्नावर अवलंबून नसलेल्या मनोगतावर आपला वरील प्रतिसाद "चकटफू" प्रकाशीत झाला नं ?
मग मराठीच्या रक्षण - संवर्धनाची जबाबदारी आपण मनोगतावर व स्वतः वर (मनोगती म्हणून) टाकतो का ?
स्पर्धायुगात जे अशक्य आहे ते करण्याचा आग्रह मनोगताला किंवा म. टा. ला कोणी केला आहे का ?
मग मनोगत किंवा म.टा / इतर वर्तमानपत्राने ही जबाबदारी जाहीररीत्या पेलली किंवा नाही त्याला अर्थ आहे का ?
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणी काय करावे हे सांगण्याचा उद्देश्य ह्या प्रतिसादात नाही पण ज्यांनी ही जबाबदारी पेलण्याचे नाटक / आविर्भाव केला आहे त्यांनी तरी करावे की नाही ?
प्रश्न आहे की मराठी वृत्तपत्रांत हिंग्लिशाळलेले मराठी वापरणे व वापरल्यानंतर त्यावर आलेल्या टीकांना अशी उत्तरे देणे हे कितपत योग्य आहे.
हा प्रश्न आपण अनुत्तरितंच सोडला आहे !