१)मनोगत आणि कुठलेही दैनिक यांची तुलनाच होऊ शकत नाही. वाचण्याची सोय ही एकमेव बाब सोडली तर दोन्हीत सारखेपणा काहीच नाही. मनोगत (किंवा ऑर्कुट) हे इन्स्टंट पब्लिशिंगची सुविधा असलेले प्लॅटफॉर्म आहेत. वृत्तपत्रात तेथील संपादकीय खात्यातील लोकांनी लिहीलेले किंवा मान्य केलेलेच प्रकाशित होते. या वेबवरच्या फलाटांचे तसे नाही. इथे मी आत्ता शिव्या जरी लिहील्या तरी त्या इन्स्टंट प्रकाशित होतील. (पुढे प्रशासक काढून टाकू शकतात हा भाग वेगळा.) दोन्ही गोष्टींची बिझीनेस, रेव्हेन्यू मॉडेल्स वेगवेगळी आहेत. हा मूलभूत फरक प्रश्नांची फैर झाडण्याआधी लक्षात घेतला गेलेला दिसत नाही.

2) ...ज्यांनी ही जबाबदारी पेलण्याचे नाटक / आविर्भाव केला आहे त्यांनी तरी करावे की नाही ?

हो, 1985पूर्वीचे पत्रकार हे या बाबतीत तुम्ही जे म्हणताय ते नाटक अविर्भाव वैगरे करायचे. त्यांनी ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्नही केला. पण त्यानंतर हा प्रकार क्षीण होत गेलेला दिसतो. हल्ली तर या आघाडीवर क्वचित कुठेतरी धुगधुगी दिसते, एवढेच.

3) प्रश्न आहे की मराठी वृत्तपत्रांत हिंग्लिशाळलेले मराठी वापरणे व वापरल्यानंतर त्यावर आलेल्या टीकांना अशी उत्तरे देणे हे कितपत योग्य आहे.

शंभर टक्के योग्य आहे. असं पहा, फक्त भाषाच नव्हे, तर कुठल्याही बदलाला सुरुवातीला विरोध होतच असतो. टीका होतच असते. त्यांना उत्तरे देत - न देत पुढे जावेच लागते. (नाहीतर आपल्या मते दुसरा काय मार्ग आहे?)