गेल्या काही महिन्यात पुणे चित्रपट महोत्सव वगैरे कार्यक्रमांमध्ये सावली, मायबाप, नितळ, रेस्टॉरंट, मातीमाय हे  नव्या दमाच्या दिग्दर्शकांचे चांगले उत्तमोत्तम मराठी चित्रपट पाहण्यात आले. तिथे सर्वांची खंत एकच की पुण्यामध्ये सिटी प्राईड वगळता इतर मल्टिप्लेक्स चालक आमचे चित्रपट प्रदर्शित करत नाहीत. "जाऊ तिथं खाऊ", "कायद्याचं बोला" वगैरे व्यावसायिक दृष्टीकोण बाळगून निर्मिती केलेल्या चांगल्या चित्रपटांनाही महाराष्ट्रातील बहुतेक मल्टिप्लेक्समध्ये स्थान मिळाले नाही. आता या चित्रपटचालकांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नाट्यगृहचालकांची मनधरणी करावी लागत आहे.

असा दुजाभाव दाखवणाऱ्या कन्नड मल्टिप्लेक्सधारकांना हिंदी चित्रपट दाखवण्याची संपूर्ण बंदी याआधीच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.

आणि आपले मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारचा मराठी चित्रपट गौरव - लाईफटाईम अचिवमेंट पुरस्कार यश चोप्रांना देतात... त्या कार्यक्रमात चोप्रासाहेब हिंदीत भाषण करतात व शेवटी आपले मुख्यमंत्री त्यांच्यासमोर "आता तुम्ही तरी एखादा मराठी चित्रपट काढून आमच्या चित्रपटांना ऊर्जितावस्था आणा" अशी शेपटी हालवतात.

नवीन प्रवाह फारच दमदार आहे व आपल्याला ऍडजस्ट होऊन राहण्याशिवाय पर्याय नाही हेच खरे.