वृकोदर,

बरोबर आहे आपले. मूर्खपणा हा शब्द वापरायला नको होता हे मानले. 'पीछेहाट' सारखे उर्दू/फारसीचा प्रभाव असणारे शब्द मराठीप्रेमी मंडळी वापरतात तर ट्रान्स्फॉर्मर कां नाही, असा माझा प्रश्न होता. परंतू हा गौण मुद्दा होता.

मी उपस्थित केलेला बोलीभाषेतील शब्द प्रमाणित भाषेत समाविष्ट करण्याचा मुद्दा जास्त महत्त्वाचा होता. बोलीभाषेच्या वापराने मराठी टिकून रहायला मदत मिळेल. कारण बोलीभाषा ही जनसामान्यांच्या जिव्हाळ्याची भाषा असते. श्रेष्ठ साहित्यात ती वापरली जाते. आणि तरीही ते साहित्य मराठी साहित्य म्हणूनच ओळखले जाते. प्रमाणित मराठीने बोलीभाषेतील शब्दांना अशुद्ध म्हणून नाक मुरडल्यास एका मोठ्या वर्गापासून मराठी स्वत:ला दूर ठेवत आहे असे मला वाटते.

ह्याबाबत सन्माननीय सदस्यांचे मत जाणून घेण्याची इच्छा आहे.

आपला,

-राजेन्द्र