लेखामधील कहाणी चटका लावणारी आहे. मूळ अनुभव व त्यावर आलेला प्रतिसाद वाचल्यावर असे वाटते की सर्वसामान्य माणूस नेहमी प्रतिक्रियात्मक विचारच करतो की काय? एखादी चांगली गोष्ट करायचा विचार सुद्धा एक जाहिरात वाचल्यावर, एक मोहक चेहेरा नजरेसमोर आल्यावरच यावा का? हीच मानवी मनोवृत्ती असल्यास त्याचा गैरफायदा घेणारे लोक पुढे सरसावले तर त्यात आश्चर्य नाही. पण मदत मागणाऱ्यांचा हेतू कसा समजून घ्यायचा? कुणावर विश्वास ठेवायचा?