रोहिणी छान पाककृती! चित्र बघून तोंडाला पाणी सुटले!!

पोहे भाजायचे असतील तर मायक्रोवेव्ह पद्धतीनेसुद्धा चांगले भाजता येतात. किमान तापमानावर जास्त वेळ ठेवावे लागते, मी २०० डिग्रीवर १-१.५० तास ठेवते. मधून मधून खालीवर करावे लागते, पण हाताला धग बसत नाही, खूप ढवळल्याने दुखूनही येत नाही. पोहे सुद्धा भाजले गेले तरी वळत नाहीत, सरळ, अखंड राहतात.

अजून एक - जर का आवडत असेल तर आमचुर पावडर घातली तर छान आंबट, व साखरेची गोड, मिरचीची तिखट अशी मिश्र चव येते.