आत्मविश्वास गमावलेला माणूस किंग किवा क्विन होऊ शकतो? समजा झाला, तरी टिकून राहू शकतो?
अशा माणसांना किंग किंवा क्विन मी कसं म्हणीन राजा.
पण बघ जरा आसपास, लाखो रुपये देऊन वेगवेगळ्या मार्गानी तुझं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. तुला कोणते आकार, रंग आवडतात त्यात उत्पादनं तयार किंवा आवेष्टीत होऊन  येताहेत. तुला वेळ असेल तेव्हा उत्तमोत्तम कार्यक्रम दाखविण्याची स्पर्धा लागली आहे.  तुला कोणत्या प्रकारे किंमत चुकवणं सोपं पडेल हे हेरून बिग बायच्या योजना आखल्या जाताहेत. तुला आवडत्या भाषेत बोलण्याची- लिहीण्याची स्पर्धा चालू आहे.
इतिहासात हे फक्त राजेमंडळींच्याच वाट्याला आलंय राजा. थोडेसे पैसे पाकिटात असले की तू राजा आहेस.

फक्त तू निर्णय काय घेतोस यावर तुझं राजेपण अवलंबून आहे. यांना बळी न पडता एंजॉय कर. निर्णय मात्र स्वतःच्या बुद्धीने घे. (उदाहरणार्थ ः ज्याची सर्वाधिक जाहिरात होते, ते क्रिम टाळ. जाहिरातीचे पैसे तुझ्याच खिशातून जाणार आहेत. )