एक सल्लागार म्हणून काम करताना मला जे किस्से ऐकायला मिळाले त्यातला एक.

एक बोका त्याच्या गल्लीतल्या मांजऱ्यांना फारच त्रास द्यायचा. त्यांच्यावर बळजबरी करायचा. मांजरी या त्रासाला कंटाळून गेल्या होत्या. बोक्याचे पारिपत्त्य करण्याचा त्यांनी निश्चय केला. काही चांगल्या कुत्र्यांची मदत घेऊन त्यांनी बोक्याचे ऑपरेशनच करुन टाकले. बोका अनेक दिवस गायब झाला. मांजऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण पहातात तो काय, कांही दिवसांनी तोच बोका परत येऊन मोठ्या डौलाने फिरताना दिसला. आता त्याच्यापासून काहीच धोका नसल्याने एका मांजरीने त्याला विचारले, "एवढे होऊनही तू इथे निर्लज्जपणे फिरतो आहेस ?" त्यावर बोका म्हणाला, " मी आता एक तज्ञ सल्लागार आहे."  
मी स्वतः सल्लागार असताना मलाच हा किस्सा सांगणाऱ्याच्या मतावर अधिक भाष्य करण्याची जरुर नाही.