आपल्या लिहीण्यातून तळमळ जाणवली. वर्ल्ड व्हीजन या संस्थेबाबत आधी एक गोष्ट ऐकली होती म्हणून अजून खोलात जाऊन बघिततले:

  1. आधीच्या माहीती प्रमाणे: १९९३ - विश्व हिंदू परीषद ऑफ अमेरिका (व्हिएचपीए) आणि इतर अनेक संघटनांनी मिळून विवेकानंदांच्या ऐतिहासीक भाषणाच्या शतकपुर्ती निमित्त एक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी १०००० लोक वॉशिंग्टन डि‌. सी. ला आली होती. त्या कार्यक्रमाचे नाव होते: "वर्ल्ड व्हीजन २०००". त्यासाठी अमेरिकेभर दोन वर्षे जाहीरात चालू होती. अचानक "वर्ल्ड व्हीजन" या संघटनेने २-३ महीने आधी कोर्टात खटला भरून त्या नावावर त्यांचा ट्रेडमार्क असल्याचे सांगीतले, परीणामी न्यायालयाने "व्हिएचपीए" ला नाव बदलायला सांगीतले आणि त्यांना ऐन कार्यक्रमाच्या वेळेस ते "व्हीजन २०००" करावे लागले.
  2. गुगलवर बघितले तेंव्हा समजले की गुगलग्रुप्समधे भारतीय आणि श्रीलंकन लोकांनी या संस्थेवर टिका केली आहे.
  3. विकीपेडीयाच्या माहीतीप्रमाणे: "As a Christian organization, World Vision participates in strategic initiatives with Christian leaders and lay people of all denominations through conferences, consultations, training programmes and various educational opportunities..."
  4. एखादी संस्था ही आपल्या ध्येयाचा उपयोग नक्की त्या ध्येयपुर्तीसाठी करते का "गर्भित सत्य" वेगळे असते हे पाहाणे महत्त्वाचे असते.
  5. वर्ल्ड व्हीजन इंटरनॅशनल म्हणून एक वेगळी संस्था देखील आहे....!
  6. मी ख्रिश्चनसंस्थांच्या विरोधात नाही. किंबहूना "सेवा" हा भाग त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे (जरी मदर तेरेसांबद्दल माझे मत वेगळे असले तरी). जर ती भारतीय (कुठल्याही धर्माच्या) संस्थांनी केली नाही आणि मग हे बाहेरचे कायाद्यानुरूप येऊन मदत करत असले तर आपण काय करणार - निदान ते नक्की काय करतात हे पाहाणे महत्त्वाचे वाटते. त्यांचे काम नक्की कुठल्या भागात जोर धरून आहे ते पाहणे ही महत्त्वाचे आहे.
  7. आज भारतात हिंदू आणि अ- हिंदू संस्था तसेच निधर्मी संस्थापण बऱ्याच आहेत. कुणाला मदत करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मदत तर नक्कीच प्रत्येकाने करावी पण ती करण्या आधी त्या संस्था नक्की काय काम करतात, पैशाचा योग्य उपयोग होतो का, मूळ कामासाठी किती पैसा जातो, इत्यादी गोष्टी बघून मदत करावी. पण पैशाची मदत सर्वात सोपी असते, निदान (ज्यास शक्य आहे अशा प्रत्येकानेच) आपला काही वेळ - मासीक अथवा वार्षीक तत्त्वावर - यथाशक्ती आपल्या विचारांशी संलग्न असलेल्या सामजीक संस्थेला आणि पर्यायाने समाजहितासाठी द्यावा असे वाटते.

लहानपणी शिकलेला श्लोक - जसा आठवतो तसा लिहीतो, चू.भू. द्या̱. घ्या.

सदा गोड वाणी वदावी मुखाने, करावे द्विजा दान धर्माकराने

जनाचे करावे भले बा श्रमाने, स्वधर्मावरी प्रित ठेवा मनाने

(जाता जाता: यातील धर्म हा शब्द मी माझ्यापुरता रिलीजन या अर्थाने घेत / वापरत नाही तसेच द्विज हा पण जातीवाचक  शब्द म्हणून घेत नाही)