जी.एस., आनंदघन आणि नाम्या, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परंतु लेख लिहिण्याचा उद्देश त्या संस्थेची प्रसिद्धी किंवा भलामण असा नव्हता. माझ्यासारखी लोकं, आपल्या स्वतःच्या आयुष्यात एवढी गुंग असतात, की एखादी चांगली गोष्ट करण्यासाठीही वेळ काढू शकत नाहीत. किंबहुना काढू शकतात पण टाळंटाळ करतात. अशा लोकांवर ही टिप्पणी आहे.

संस्था कोणतीही असूदे दानत आणि इच्छा महत्त्वाची. आमचे एक प्राध्यापक आम्हाला सांगत असत, दान करावंसं वाटलं तर करावं, त्याचं पुढे काय होतं ह्याचा विचार करू नये, कारण तसं केलत तर आयुष्यात कधीही तुमच्या हतून दान होणार नाही. पण लेखातला मुद्दा हा नव्हताच.