साक्षीजी तुम्ही अतिशय स्फूर्तीदायक स्मृतींना उजाळा दिलेला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर, एक उत्कट कवी, सिद्धहस्त लेखक, जाज्वल्य देशाभिमानी, उत्कृष्ट नाटककार आणि मातृभाषेचे निःसीम भक्त होते. त्यांचे सर्वच लिखाण आजही तेवढेच स्फूर्तीदायक आहे. त्यांनी मायबोलीकरता घडलेले कित्येक शब्द आज आपण मनोगतावर अभिमानाने वापरत आहोत. त्यांच्या पावन स्मृतीस सादर प्रणाम!