ऊसापासून एकतर साखर तयार केली जाऊ शकते (त्यासाठी तो ऊस साखर कारखान्याने विकत घ्यायला हवा) किंवा गूळ तयार केला जाऊ शकतो (त्यासाठी शेतकऱ्याला गुऱ्हाळ टाकणे परवडले पाहीजे) यातले जर शेतकऱ्याला काही शक्य झाले नाही तर त्याच्याकडे ऊस जाळण्याशिवाय काही पर्याय उरतो असे वाटत नाही. पुढच्या हंगामासाठी जमीन तयार करण्यासाठी त्या ऊसाची काहीतरी 'विल्हेवाट' लावणे आवश्यक असते, त्यामूळे सर्वात शेवटचा पर्याय हाच असावा.

ऊसासाठी याव्यतिरिक्त इतर कोणते पर्याय ज्ञात असतील तर कृपया सांगावेत. (गरीबांमध्ये वाटणे, किंवा चाऱ्यासाठी - यासाठी ऊस तोडण्याचा खर्च परवडेल का याचा विचार व्हावा.)

"..धार्मिक भावना दुखावणे" वगैरे या घटनांमधली विकृती आणि फोलपणा मान्य आहे पण मग सर्वच घटनांचा असा एकत्रित विचार करून सर्वच समाजनेत्यांना सरसकट दोष देता येणार नाही..."  या मताशी सहमत.

(अवांतर: ऊस जाळण्याचे आंदोलन करणारऱ्या शेतकऱ्यांना, आपल्या संवेदनशील सरकारकडून, ऊस जाळू नका असे काही निवेदन आले आहे का? का?)