शेतकऱ्यांना ऊस का जाळावा लागतो? तर एकतर साखर कारखाने तो गाळपासाठी वेळेवर नेऊ शकत नाहीत, गुऱ्हाळात ऊस गाळणे परवडत नाही आणि चारा म्हणून तो विकण्यासाठीचा खर्च आणि त्यासाठी आवश्यक स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसते म्हणून (जाळण्याच्या अवस्थेतला ऊस चारा म्हणून वापरला जाऊ शकेल का हा वेगळा प्रश्न) . 'गरीबांमध्ये (खाण्यासाठी?) वाटणे' हा फारच पुस्तकी पर्याय आहे म्हणून त्याचा विचार करायला नको.
प्रश्न असा आहे की एकरी दहा, बारा, पंधरा हजार रुपये खर्च करुन शेतात बारा चौदा  महिने वाढवलेला ऊस जाळण्याची परिस्थिती शेतकऱ्यावर का येते? शेतीचे ढिसाळ नियोजन, निर्यातीचे धरसोडीचे धोरण.. एकंदरीत गलथान व्यवस्थापन! पण शेतीबाबतच का? हेच चित्र सगळ्या देशाचे नाही का?