सर्वसाक्षी,
तुमच्या आणि माझ्या मनातील सावरकरांच्या आदराविषयी फारसा फरक असेल असे मला वाटत नाही.
माझ्या मनातील राजकारणी म्हणजे जो चाणक्याच्या, शिवाजी अथवा सरदार पटेलांच्या तुलनेचा राजकारणी असा पकडावा.
अर्थातच सावरकर त्या पात्रतेचे होते परंतु त्यांचे काही अंदाज क्रांतीच्या बाबतीत चुकले असावे. ज्या नरसिंहाने पूर्णं भारताचे राजकारण, समाजकारण हाताळावे असा पुरुष रत्नागिरीमध्ये अडकून पडावा आणि समाजसुधारणेपर्यंतच स्वतःला सीमित ठेवावे याचे कोणाही देशभक्ताला वाईटच वाटेल.
अर्थातच त्यामुळे सावरकरांना काही कमीपणा येतो असे मला वाटत नाही. एक सच्चा भाषाप्रेमी म्हणून मला त्यांच्या कडून बरेच काही शिकता येईल असे वाटते.
द्वारकानाथ