को अहम,
आपल्या प्रतिसादावरून त्याच संदर्भातील एक गोष्ट आठवली ती इथे लिहीतो:
एका राजाचा आपल्या जनतेच्या कष्टावर आणि प्रामाणिक पणावर खूप विश्वास असतो. ते पाहून त्याचा गुरू त्याला ते तपासण्याची उक्ती सांगतो. त्याप्रमाणे राजा दवंडी पिटवून सांगतो की स्वप्नात झालेल्या साक्षात्काराप्रमाणे जनतेच्या भल्यासाठी एक मोठा अभिषेक योजला आहे. त्यासाठी साक्षात शंकराने प्रत्येक घरातून एक वाटी दूध देवळातील हौदात गोळा करायला सांगीतले आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने आज संध्याकाळी अंधार पडल्यावर उद्या सकाळी उजाडायच्या आत प्रत्येकी घरटी एक वाटी दूध आणून घालावे.
देवळासमोर सर्व प्रजाजनांची मोठी रांग लागते. सकाळी राजा दूध बघायला जातो पण हौदात फक्त पाणीच असते! - कारण प्रत्येकजणच विचार करतो की इतर जर दुध घालणार असले तर एक वाटी पाणी असले तर काय बिघडले!