आपण वर्तमानपत्रातील मराठीविषयी लिहिले आहे पण, सर्वसाधारणपणे सर्व वर्तमापत्रांचा दृष्टीकोन व्यावसायिक झाला आहे. मग ते इंग्रजी असो वा मराठी, त्यांया दृघ्टीने शुद्धलेखन वगैरे या शाळेत सांभाळायच्या गोष्टी आहेत. वर्तमानपत्रांचे सोडून द्या.

पण आज दुरदर्शन घरोघरी पोचले आहे. तिथे काय अवस्था आहे. झी मराठीवरचा सध्याचा लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप' चेच घ्या. सूत्रसंचालक पल्लवी जोशी मराठी वातावरणत वाढलेली, पण तिला रिक्वेस्टला मराठी 'विनंती' आठवत नाही. आणखी अनेक शब्द आहेत ज्याना सहज सोपे मराठी शब्द आहेत पण या कार्यक्रमात इंग्रजी शब्दांचा वापर सहजपणे केला जातो. हेच तर मराठीचे दुर्दैव आहे कि, ज्यानी तिच्या संवर्धनासाठी जागरूक रहाणे आवश्यक आहे तेच त्याबाबत जागरूक नाहीत.