आदरणीय व अनुकरणीय यांत जमिन अस्मानाचा फरक आहे.
मुळात गांधींचे अनुयायी, आंबेडकरांचे अनुयायी व हेडगेवारांचे अनुयायी हे पूर्णत: भिन्न प्रकारचे आहेत.
अनुयायी म्हणजे कुणाच्या नावे झिंदाबाद च्या घोषणा देत हैदोस घालणारे, मिरवणुका काढणारे, प्रतिमा मिरवणारे असे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनुयायी नाहीत हे फार भाग्याचे आहे असे म्हणावे लागेल. अनुयायी म्हणजे काय? याचे उत्तर निश्चित नाही.
सर्वस्वाची राखरांगोळी करून आपल्या हाताने घरादारावर निखारा ठेवून आपले कुटुंब उघड्यावर पडेल; ते जगेल की मरेल याची क्षती न बाळगता देशकार्यात झोकून देणाऱ्या जाज्वल्य देशाभिमानी व्यक्तिस किती अनुयायी असतील? 'भगतसिंह जन्माला यावा; पण शेजारच्या घरात' हा वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे हे आपल्याला ठऊक असेलच, आणि हा वाक्प्रचार बरेच काही सांगून जातो.
सगळ्याच ठिकाणी संख्या हा निकष लागत नसतो. हुतात्मा भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे सावरकरांचे दोन अनुयायी आपण विसरलेले दिसता:). गांधी आणि आंबेडकर यांचे अनुयायी या विषयी एक स्वतंत्र चर्चा करता येइल. डॉ हेडगेवार यांचे अनुयायी म्हणजे राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे अनुयायी असे बहुधा आपल्याला अभिप्रेत असावे. हेडगेवार, गुरूजी वगैरे व्यक्तिंना वैयक्तिक अनुयायी नसून त्यांना आपल्या नावे उदो उदो करणाऱ्यांची हौस नसावी असे वाटते, अर्थात संघाविषयी मला फारशी माहिती नाही पण जे काही थोडेफार वाचण्यात आले त्यावरून तिथे पदरचे खाऊन कार्य करणारे जातात असे वाटते. प्रसिद्धी, मिरवणूका, केलेल्या कामाची पत्रके गावच्या भिंतीवर लावणे असे उद्योग करताना हे लोक दिसत नाहीत.