मागे http://www.sureshbhat.in/ या संकेतस्थळावर पोएटिक लिबर्टी यासंबंधी आणि बरेचदा मनोगतावर यतिभंगाविषयी विविध मते वाचली आहेत.

वरच्या कवितेत प्रत्येक चरणाच्या दुसऱ्या ओळीत यतिचे स्थान बदलते आहे. एका ठरलेल्या चालीतच वृत्त गुणगुणल्यास यतिचे एकच स्थान पक्के होते. परंतु वेगवेगळ्या चालीत यतिचे स्थान बदलू शकते.

वरची कविता पुढील चालींत म्हणून पहा म्हणजे यतिभंगाची (पूर्व)कल्पना स्पष्ट होईल.

१) चल ऊठ रे मुकुंदा
२) गे मायभू तुझे मी
३) काटा रुते कुणाला

शेवटच्या ओळीत "बागेतल्या कळ्या नाही(त) सांगणार काही" असे हवे पण वाचताना,कानाला ते खटकतेच असे नाही. (मला मात्र लिहून झाल्यावर हे लक्षात आले) ही सूट की तडजोड की खपवाखपवी  ?