पहिले, शुद्ध मराठी म्हणजे काय, हे तर स्पष्ट करा. बोलीभाषेतले अधिकाअधिक शब्द प्रमाणभाषेत रूढ व्हायला, रुजायला हवेत. संस्कृतप्रचुर मराठी म्हणजे शुद्ध मराठी नव्हे, असे माझे मत आहे. बरेचदा सर्वच परकीय शब्दांना पर्यायी मराठी शब्द शक्य नसतात किंवा परकीय शब्दांचे मराठीकरण अगदी हास्यास्पद असते. आकाशवाणीच्या मराठीतल्या बातम्या वाचल्या तर थोडी कल्पना येईल. म्हणूनच बलराज सहानीने आकाशवाणीवरील हिंदी बातम्यावर 'ये तो हिंदी में समाचार सुनिए कि बजाए समाचारों में हिंदी सुनिए होना चाहिए' अशी टिप्पणी केली होती.
मग रोजच्या वाचताना मग जनरेटरसाठी जनित्र, काउन्सलरसाठी समुपदेशक असे शब्द आडवे येतात. एखाद्या मकॅनिकला दुरुस्ती ऐवजी ओव्हर ऑयलिंग हे औवरहोलिंगचे अपभ्रंशित रूप जवळचे वाटते.
चित्तरंजन