"...आजच्याच लोकसत्तेमधे  " गोव्यातील मद्यालये बंद : पर्यटकांचे हाल " असे शीर्षक आहे. दारुवाचून कोणाचे हाल होऊ शकतात हे आज नवीनच कळले..."

यात फारसं  काय चूक आहे? गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. बहुतेक लोक गोव्यात सत्संगासाठी जात नाहीत. मौजमजे साठी जातात. अशावेळी मद्यालय बंद असतील तर निराशा नक्कीच होणार. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर सुद्धा झाला असेल. उद्या "लास वेगास मधील कॅसिनो बंद: पर्यटकांचे हाल"  अशी बातमी आली तर आपण लगेच "नैतिकता बुडाली" अशी ओरड करू का?

एक खरं की इथे "हाल" हा शब्द जरा हार्श वाटतो.  कारण "हाल" हा शब्द कायम "विजेवाचून", "पाण्यावाचून" या शब्दांबरोबर वाचायची सवय झाली आहे. "निराशा" शब्द चालला असता.