अभिप्रायाबद्दल आभार.

लेखन करण्यासाठी प्रथम आपले सदस्यनाम व परवलीचा शब्द वापरून इथे आल्याची नोंद करा. ती करताच उजव्या हाताला आपले नांव दिसेल. त्यावर टिचकी मारली तर पर्याय उलगडतात. पैकी तिसरा पर्याय लेखन करावे असा आहे. त्यावर टिचकी मारताच आपण लेखनपृष्ठावर येता. तिथे आपण कविता/ गद्यलेखन वगैरे मधून आपला पर्याय निवडू शकता. साहित्य मध्ये गेलात तर लेखाचे विषय, शिर्षक असे रकाने असतात. त्यापुढे एका छोट्या चौकोनात बरोबर ची खुण केलेली असते व पुढे 'प्रसिद्ध करण्यायोग्य' असे लिहिलेले असते. अशा स्थितीत केलेले लेखन लेख सुपुर्द केला व लेखन प्रशासकांनी संमत केले तर ते सर्वांना दिसू शकते व त्याला लोक प्रतिसाद देउ शकतात. मात्र आपण लेखन केल्यानंतर जर काही सुधारणा व फेरविचार करून मग लेखन प्रसिद्ध करायचे असेल तर मात्र लेखन झाले की सुपुर्द करण्यापूर्वी त्या चौकोनातली बरोबर ची खूण काढा. म्हणजे लेखन प्रसिद्ध होइल पण ते केवळ आपल्यालाच दिसेल. मग जेव्हा सुधारणा करायची असेल तेव्हा पुन्हा नोंद करून 'माझा सहभाग' मधून आपले ते लेखन निवडा व संपादन पर्याय वापरा. सुधारणा झाली की चौकोनात बरोबर ची खूण आणा व सुपूर्द करा.

आपल्या लेखनासाठी शुभेच्छा.