मिलिंद, अजूनही काही खाचाखोचा मला कळत नाहीत. माझा समज होता की, मुळात काफ़ियात सूट घेऊन त्याला स्वर-काफ़िया केले (ई) की अलामतीत सूट मिळते, कारण अलामत हा स्वर आहे आणि जर काफ़ियाच स्वराचा केला तर पुन्हा त्यामागे आणखी एक स्वर कशाला? पण आता लक्षात आले की तुम्ही म्हणताय तसे, काफ़िया जरी स्वराचा असला तरीही अलामतीचा भाग उरतोच आणि या मतल्यात 'ज' मुळे 'अ' ही अलामत निश्चित झाली आहे ती मी पुढे पाळायला हवी होती. धन्यवाद!
-- पुलस्ति.