प्रिय मी मराठी,

तुमचा प्रतिसाद आवडला. तुम्ही भाषाशास्त्री दिसता. मी चॉमस्की नसलो तरी मला वाटतं की मराठी असो वा स्वाहिली, जी भाषा बदलत नाही ती मरते. जग काही हजार वर्षांनंतर नक्कीच एकाच भाषेत बोलणार आहे. प्राकृत, गुजराती, पंजाबी, तमिळ, बास्क इत्यादि भाषा केवळ त्या प्रवासातील काही पडाव आहेत, असे माझे ठाम मत आहे. शेवटी जग एकसंध होणारच.

आता राहिली संस्कृतची बात.संस्कृत शेतकऱ्यांची, कामकऱ्यांची भाषा कधीच नव्हती. ती दरबाऱ्यांची, ब्राह्मणांची किंवा कुलीनांची भाषा होती. त्यांची Lingua Franca होती. (फ्रेंच भाषा ही एकेकाळी युरोपातल्या कुलींनाची भाषा होती. अजून असावी.)

 

-चित्तरंजन