लेख वाचून पटकन कवी यशवंतांची शाळेत शिकलेली 'करिते का कधी खंत सरिता' या ओळींनी सुरू होणारी कविता आठवली. आमच्या इंग्रजीच्या बाईंनी मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षिकेची परवानगी काढून ही कविता चालीवर म्हणून दाखवली होती आणि त्याचा अर्थ सांगितला होता. तसंच दहावीत कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेतील "कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती" या ओळीतील जगतात आणि जगती हा श्लेष मराठीच्या बाईंनी दाखवून दिला होता.
बाकी लेखातील इतर किस्से वाचून 'भय्या नागपूरकर' मधील जयदेवाच्या गीतगोविंदातील राधेचे वर्णन आठवले.