माझे केस साधारण २५सेमी वगैरे लांब आहेत. ते बांधले तर फारच जड वाटतात डोक्याला. त्यामुळे शक्य असेल तेव्हा मी ते मोकळे ठेवते. काम, स्वयंपाक वगैरे करताना मात्र मधे येऊ नयेत म्हणून बांधून ठेवते.
केस नीट विंचरायला, बांधायला सवड होत नाही म्हणून माझ्या बऱ्याच मैत्रिणी लांब केस आवडत असून ते वाढवत नाहीत. माझ्या अनेक पुरुष सहकाऱ्यांचे केस लांब आहेत. तेही जास्तीत जास्त मानेजवळ एका रबराने वगैरे केस बांधतात, पुष्कळसे लोक मोकळेच सोडतात. एकाचे तर काळेभोर लांबसडक कंबरेपर्यंत केस तो मोकळे सोडून येतो! एकदम जाहिरातीतल्या सारखे दिसतात ते. :-)
केस मोकळे सोडण्याचा दु:ख , क्रोध किंवा अशुभ याच्याशी संबंध आहे असे समजण्यात येत होते.
पूर्वी सौंदर्यवर्धनासाठी केस बांधायची पद्धत असावी. कारण ते नीट कापले असले तरच मोकळे सोडल्यावर चांगले दिसतात. आता केशकर्तनाची कला चांगलीच प्रगत झालेली असल्याने लांब, मोकळे केसही सुंदर दिसतात. मोकळे सोडणे सोपे. त्यामुळे किमान रोधाच्या दिशेने वाटचाल होऊन हल्ली मोकळे केस हा नवा पायंडा पडत असावा.