रामायणात रामाचे ही केस लांब आणि मोकळे सोडलेलेच होते (टी.व्ही. त तरी असेच दाखवले) ..म्हणून मग त्यालाही दु:ख होते असे मानावे लागेल. जर आज मुलंही  मानेपर्यंत लांब केस ठेवून ते मोकळे सोडतात..तर मग मुली केस मोकळे सोडतात त्यात नवल ते काय?

आणि माझे प्रामाणिक मत - दु:खाचा, क्रोधाचा आणि अशुभाचा लांब केसांशी काहिही संबंध नाही. केस हे सौंदर्याचे एक वरदान आहे. ते कसे ठेवावेत, बांधावेत की मोकळे सोडावेत..हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. मात्र कामात अडथळा येत असेल तर मात्र केस बांधून ठेवेणेच इष्ट.

- प्राजु.