अमृताच्या पैजा जिंकणारी माय मराठी असल्या उसन्या टक्केवारीची मोहताज नाही हे माझे मत...   

मनकवडे साहेब, 'मराठी चा ऱ्हास होतोय' ह्या आपल्या विधानाचे दोन अर्थ निघतात

१. मराठी भाषा रोजच्या वापरातून लुप्त होत आहे.

माझे मत काळाच्या प्रवाहात आज संस्कृत आणि पाली भाषा आज व्यवहारात कोठे आहेत? त्या भाषा व्यवहारात वापरण्या साठी किती टक्केवारी देणार आहात? भाषा रोजच्या व्यवहारात नही म्हणजे नष्टं झाली का? मराठी आशी कालाच्या ओघात नष्टं होणार नाही कारण,... मुद्दा २ वाचावा,...  

२. मराठी भाषेत नवीन शब्द येत आहेत

मी म्हणेन मराठी समृद्ध होत आहे. कारण ती खूपच प्रवाही भाषा आहे.

शिवकालीन बखरी वाचायचा प्रयत्न करावा, आपल्या माय मराठीत झालेले बदल आचंभीत करतील..... हा होणार बदल मराठीला पोषक आहे, तिचा तो प्राणवायू आहे, तोच मराठीला व्यवहारात टिकवेल आणि समृद्ध पण करेल..  

मनकवडे साहेब आपल्या मनातील पोकळ भीती (माझ्या मते, आपल्यास पटत नसेल तर क्षमा करा), काढून टाका आणि आपले लिखाण चालू ठेवा.

- राज