लेख वाचून मजा वाटली. मला चहा कॉफी दोन्ही फारसे आवडत नाही पण चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांपेक्षा कॉफीचे प्रकार बरे वाटतात. (जस्मिन फ्लेवरचा चहा गेल्यावेळेस गिळला होता, चहा होता की नाही ते कळलंच नाही पण जस्मिनच्या सुगंधाने डोकं फिरायची वेळ आली होती.)

त्यामानाने कॅपुचिनो, लात्ते इ. आवडते. अमेरिकन कॉफी आधी कशीशीच वाटायची पण आता सवय झाली आहे.

फ्रेंच वॅनिला, इंग़्लिश टॉफी, व्हाईट चॉकलेट, मोका, हेझलनट फ्लेवर आवडतात. तिरामिसूही आवडते.

अमेरिकन लोकांनी ज्या गोष्टींची वाट लावली आहे, त्याला कॉफी अपवाद नाही.

हाहा! सहमत आहे.

अरमानी म्हणजे जिऑर्जीओ अरमानी का?  त्याचा अभिमान असायलाच हवा आणि अल पचिनो, सोफिया लॉरेन??