सुरेख लेखन.

लेखन एखाद्या लघुनिबंधासारखे वाटले. गो. वि. करंदीकर (कवी विंदा करंदीकर) ह्यांच्या 'न चुकणारी माणसे' ह्या लघुनिबंधाची किंचित आठवण झाली.

जमीनदोस्त ... हा शब्दप्रयोग आवडला.

आमच्या वसतिगृहात असाच एक विद्यार्थी होता. त्याला रेडिओवर निरनिराळी स्टेशने लावायची हौस. सकाळी ब्रेकफास्टला मेसमध्ये यायच्या आधी हा रेडिओ पाशी जाऊन निरनिराळी स्टेशने फिरवत राही. खर्रर्रर्र खुंईंईं..... चुंईं... असे करत. एखादे स्टेशन नीट लागले रे लागले की तो ते लगेच बदलून दुसरे लावायला जाई. गाणे ऐकण्यापेक्षा स्टेशने बदलत राहण्याची अशी इतरांना त्रासदायक अशी हौस.

... आम्ही त्याला 'रेडिओऍक्टिव्ह' असे म्हणत असू.